कोल्हार वार्ताहार- (पत्रकार साईप्रसाद कुंभकर्ण) राहता तालुक्यातील दाढ येथील रहिवाशी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना तसेच मुळा प्रवरा विज संस्थेचे संचालक व जनसेवा मंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते देवीचंद भारत तांबे,वय 62 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे ते डॉक्टर सुरज व शशांक तांबे यांचे वडील तर अनिल व सुनील तांबे यांचे बंधू होत देवीचंद तांबे हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेअत्यंत निष्ठावान व विश्वासू सहकारी होते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भारत दादा तांबे यांच्या निधनानंतर देविदास तांबे पदाधिकारी म्हणून सक्रिय होते. दाढ येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे,विखे कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दाढ बुद्रुक वासियांनी गाव बंद ठेवून देवीचंद तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

Previous Post Next Post